जलजन्य आजारांचा धोका, पावसाळ्यापूर्वी ब्लिचिंग पावडरचे नियोजन गरजेचे, खबरदारी घ्या
अमरावती, 8 मे (हिं.स.) महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत जलजन्य आजा
जलजन्य आजारांचा धोका, पावसाळ्यापूर्वी ब्लिचिंग पावडरचे नियोजन गरजेचे, खबरदारी घ्या


अमरावती, 8 मे (हिं.स.) महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत जलजन्य आजारांचा धोका बळावत असल्याने या कालावधीत सार्वजनिक विहिरी, हातपंपांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे गरजेचे ठरते. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या गावात संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच वरिष्ठ स्तरावरून ब्लिचिंगचे नियोजन करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीत नेहमीच विशेषतः ग्रामीण भागात जलजन्य आजारांचा धोका बळावत असतो. तसेच अनेक गावात पाणीपुरवठा योजनांना जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने अनेक नागरिक पावसाळ्यात सार्वजनिक विहीर, हातपंपांच्या पाण्याचा वापर करीत असतात. या कालावधीत पाण्यातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक जलजन्य आजारांना बळी पडण्याचा धोका बळावत असतो. पाण्यातील जंतू, विषाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्लिचिंग पावडर महत्त्वाची भूमिका नियोजन करून ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंगचा पुरवठा करण्याची नितांत गरज आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande