शरद पवारांना पक्ष चालवणे शक्य नसल्याने विलिनीकरणाचे संकेत- देवेंद्र फडणवीस
धुळे, 8 मे (हिं.स.) : प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवे
देवेंद्र फडणवीस


धुळे, 8 मे (हिं.स.) : प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले. धुळ्यातील शिरपूर येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील शरद पवार यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना असे म्हणायचे असेल त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande