ठाणे - उथळसर प्रभाग समिती कार्यालयात स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती
ठाणे, 8 मे (हिं.स.) : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलो
ठाणे - उथळसर प्रभाग समिती कार्यालयात स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती


ठाणे, 8 मे (हिं.स.) : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन स्वीप पथकाकडून उथळसर प्रभागसमिती कार्यालयात करण्यात आले.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रभाग समिती कार्यालयात ५० हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी मतदान करणारंच..... आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande