वाळू माफियाकडून 20 हजार रूपये लाचेची मागणी करणारा तलाठी ताब्यात
भंडारा, ९ मे, (हिं.स) भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्
image


image


भंडारा, ९ मे, (हिं.स) भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्भात मोठीं मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात तर ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो नाही तर 25 हजार रूपये मला दे अशी मागणी केली. पण मालकाकडे पैसे आज नाही उद्या 20 हजार रूपये देतो असे सांगीतले. ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आज सापळा रचून आरोपी तलाठी याला लाचेची रक्कम देण्यात येत असल्याने तलाठी याला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande