भंडारा : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
भंडारा, ९ मे (हिं.स.) : भारतीय संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्वाची आणि सार्वत्रीक क्र
भंडारा : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क


भंडारा, ९ मे (हिं.स.) : भारतीय संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्वाची आणि सार्वत्रीक क्रिया आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहर्तावर सामुदायीक तथा एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. या समारंभात बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्हयात लागु करण्यात आले आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांचेस्तरावरून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मदत करणारे भंडारा जिल्हयातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक,मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर,आचारी,मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक,बैंडवादक, कॅटरिंग चालक,विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेतांना मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष पुर्ण झाल्याची खातरजमा करूनच विवाह समारंभाची बुकीग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपुर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपुर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये बाल विवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो.ती व्यक्ती २ वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लाख रूपयापर्यंत असेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल.बाल विवाह सदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आहे.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande