भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
भंडारा, ९ मे (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसा
भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी


भंडारा, ९ मे (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी देखिल जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढलं होत. आज परत सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाला होता.

पाहता पाहता काळे ढग दाटून आले व मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. रब्बी हंगामातील धान पिक शेतकऱ्यांनी कापून ठेवले असल्याने आधीच आलेल्या पावसामुळं संपुर्ण धान पिकं पाण्याने भिजले आता परत पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande