साेलापुरातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसला शंका
सोलापूर , 9 मे (हिं.स.) साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसने शंका घेतल
साेलापुरातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसला शंका


सोलापूर , 9 मे (हिं.स.) साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसने शंका घेतली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान पूर्ण झाल्यानंतर ५७.४६ टक्के मतदान झाल्याचा दावा केला हाेता.त्यानंतर १२ तासांनी ५९.१९ टक्के मतदान झाल्याचा दावा केला. ही आकडेवारी कशी व काेणत्या मतदान केंद्रावर वाढली याचा खुलासा मागणार असल्याचे काॅंग्रेसचे साेलापूर लाेकसभा निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी गुरुवारी सांगितले.

साेलापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुध्द भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली. ही लढत लक्षवेधी ठरली. ७ मे राेजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, यलगुलवार म्हणाले, साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमाराला संपली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री ९ च्या सुमाराला ५७.४६ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी विधानसभा मतदारसंघनिहाय आणि बूथनिहाय हाेती. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता नवी आकडेवारी जाहीर केली.

यात ५९.१९ टक्के मतदान झाल्याचा दावा करण्यात आला. १२ तासांत ३५ ते ३६ हजार मते वाढल्याचा दावा प्रशासन करीत आहे. आम्हाला या आकडेवारीवर शंका आहे. काेणत्या बूथवर आकडेवारी वाढली याचा खुलासा आवश्यक आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांना यासंदर्भात पत्र देणार असल्याचे यलगुलवार म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande