डीजे लेझरमुळे दृष्टीवर परिणाम झालेल्या मुलीची दृष्टी पूर्ववत नॉर्मल
डॉ.क्षितिज तांबोळी मिडटर्म मॉस्कोन परिषदेत सादर केली माहिती अहमदनगर, 9 मे (हिं.स.):- नुकत्याच मिडटर
डीजे लेझरमुळे दृष्टीवर परिणाम झालेल्या मुलीची दृष्टी पूर्ववत नॉर्मल


डॉ.क्षितिज तांबोळी मिडटर्म मॉस्कोन परिषदेत सादर केली माहिती

अहमदनगर, 9 मे (हिं.स.):- नुकत्याच मिडटर्म मौस्कोन या राज्यपातळीवरील डोळ्याच्या डॉक्टरांच्या परिषदेमध्ये अहमदनगर येथील प्रसिद्ध रेटीना सर्जन डॉ क्षितीज तांबोळी यांनी डी जे लेझर मुळे झालेल्या डोळ्यातील रक्त स्त्रावाची केस सादर केली.या १९ वर्षाच्या मुलीच्या दृष्टी वर परिणाम झाला होता.मात्र उपचारानंतर तिची दृष्टी पूर्णपणे नॉर्मल झाली.काही मुलांना मात्र डी जे मुळे दृष्टी गमवावी लागू शकते.डी जे लेझरचा योग्य प्रमाणात वापर आणि त्या संदर्भातील नियम या बद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती व्हावी तसेच सरकारतर्फे कायदे करण्यात यावे यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध रेटीना सर्जन डॉ क्षितीज तांबोळी यांनी केले आहे.

महाराष्ट्र ओप्थेल्मिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ संतोष अग्रवाल यांनी सांगितले की महाराष्ट्र ओप्थेल्मिक सोसायटी संस्थेतर्फे डी जे लेझरचा योग्य प्रमाणात वापर आणि त्या संदर्भातील नियम या बद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती व्हावी तसेच सरकारतर्फे कायदे करण्यात यावे याची मागणी करणार असून,यापुढे डी जे मुळे दृष्टी गमावण्याची वेळ कोणावरही येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.डॉ क्षितीज तांबोळी हे रेटीना सर्जन असून डोळ्यातील अंतर पडद्याचे(रेटिना) सुपर स्पेशालिटी तज्ञ डॉक्टर आहेत.डॉ.क्षितीज तांबोळी हे बंगलोर,हैदराबाद,नाशिक आदि ठिकाणी काम करून आता अहमदनगर येथे लवकरच पूर्ण वेळ येणार आहेत.डॉ.क्षितीज तांबोळी हे राज्य आणि राष्ट्र पातळीवर मागील २ वर्षांपासून मानद वक्ता म्हणून आमंत्रित केले जातात.नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या यॉसीकॉन २०२४ या परिषदेमध्ये त्यांनी आपले संशोधन सादर केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande