जालिंदर बोरूडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान
अहमदनगर, 9 मे (हिं.स.):- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमा
जालिंदर बोरूडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान


अहमदनगर, 9 मे (हिं.स.):- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जन कल्याण फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गोंडेगाव (तालुका नेवासा) येथे तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाबा आरगडे यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गोसावी, प्राचार्य बी.पी.ढाकणे,निवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे,डॉ.अशोक ढगे,कवी भारत गाडेकर,प्राचार्य किशोर धनवटे,डॉ.अशोक ढगे,जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे आदी उपस्थित होते.जालिंदर बोरुडे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या ३१ वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या असून,या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे.तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे.नेत्र शिबिराबरोबरच समाजाची गरज ओळखून विविध आरोग्य शिबिर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते घेत आहे.या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande