उबाठा शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस
नाशिक, ०९ मे (हिं.स.) - उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक मधील जेष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर
उबाठा शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस


नाशिक, ०९ मे (हिं.स.) - उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक मधील जेष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना तडपारीची नोटीस पोलीस विभागाने बजावली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे आणि आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येणार आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी देखील होऊ लागले आहे. पण याच दरम्यान मोठी घडामोडी झाली असून त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या दरम्यान त्यातूनही लोकसभा निवडणुकीला एक प्रकारे हादरा देणारी घटना घडली आहे.

उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी सकाळी तडपारीची नोटीस बजाविण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी हे त्यांच्या निवासस्थानी गेले असता ते या ठिकाणी प्रथम भेटले नाही. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांना याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर नोटीस स्वीकारेल, असे बडगुजर यांनी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही नोटीस परिमंडळ दोनच्या उपयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.

उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामधील काही महत्त्वाचे गुन्हे म्हणजे अलीकडेच उघडकीस आलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी असलेले संबंध हा एक महत्त्वाचा गुन्हा असून त्या संदर्भामध्ये तपास सुरू आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक वलावडकर यांनी अलीकडच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्तांनी दिलेल्या पत्राबाबत त्यांची खुली चौकशी करून गुन्हा देखील सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात अजूनही काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची यापूर्वी माजी पोलीस उपयुक्त पाटील यांनी चौकशी देखील केली होती. त्यावेळी बडगुजर यांनी या सर्व प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा करत खोटी कारवाई असल्याचे सांगितले होते. गुरुवारी पोलिस विभागाने केलेल्या या कारवाईनंतर नाशिकच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून आता बडगुजर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी जी नोटीस बजावली आहे. ती त्यांच्यावरती असलेल्या निवडणुकी संदर्भातील गुन्ह्यांच्या साठी ही नोटीस बजावण्यात आलेले आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी एका नगरसेविकेचे अपहरण केल्याची गुन्हा देखील दाखल आहे. याशिवाय महानगरपालिका आणि इतर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी केलेल्या कृत्या बाबत गुन्हे दाखल असून म्हणून ही तरीपरीची नोटीस बजाविण्यात आली आहे. सर्वसाधारण मागील बारा वर्षापासून सुधाकर बडगुजर हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला आहे. तर, त्यांनी शिवसेना महानगरप्रमुख याचबरोबर महानगरपालिकेचे सभागृह नेते शिवसेना गटनेते या स्वरूपाची पद देखील त्यांनी भूषविली आहेत.

उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्यावरती निवडणुकीच्या अनुषंगाने विविध गुन्हे हे पोलीस दप्तरी नोंद झालेले आहेत आणि निवडणुकीच्या काळात असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवरती कारवाई केली जाते. त्याच अनुषंगाने पोलीस खात्याने ही कारवाई केलेली आहे अन्य कोणत्याही प्रकरणाशी या कारवाईचा काहीही संबंध नाही.

मोनिका राऊत

उप आयुक्त परीडळ -2.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande