सोलापूर - कार्यकर्त्यांकडून मतदारांचा अंदाज घेत नियमित कामांना सुरवात
सोलापूर , 9 मे (हिं.स.) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरू असलेली उमेदवार, उमेदवारांचे नातेवाईक,
सोलापूर - कार्यकर्त्यांकडून मतदारांचा अंदाज घेत नियमित कामांना सुरवात


सोलापूर , 9 मे (हिं.स.) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरू असलेली उमेदवार, उमेदवारांचे नातेवाईक, कार्यकर्ते यांची धावपळ अखेर सायंकाळनंतर थांबली. उमेदवारांनी कार्यकर्त्यांकडून मतदारांचा अंदाज घेत नियमित कामांना सुरवात केली. महिनाभरापासून सुरू असलेली दगदग अखेर थांबल्याचे पाहायला मिळाले.सोलापुरात भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापुरातील निवास्थानात विश्रांती घेतली. फोनवरून त्यांनी कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेतला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजप महायुतीचे उमेदवार सातपुते यांचा माळशिरस तालुक्याचा दौराही सुरू होता.

२४ मार्चला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर महिनाभरापासून ते प्रचारात गुंतले होते. माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदान संपल्यानंतर अनेक लोक भेटीसाठी आल्याने रात्री एकपर्यंत भेटीगाठी घेतल्या. प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आठ दिवस व्यवस्थित झोप झालीच नव्हती.

त्यामुळे सकाळी थोडे उशिरा उठून स्नान करून पुन्हा लोकांच्या भेटी घेण्यास सुरवात केली. माढा मतदारसंघातील अनेक गावातून लोक भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे आज संपूर्ण दिवस आलेल्या लोकांना वेळ देत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande