रत्नागिरी : 'स्वरनिनाद'तर्फे २८ जुलैला गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम
रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.)। गेली ८० वर्षे अविरत रत्नागिरीकरांसाठी संगीत सेवा देणाऱ्या स्वरनिनाद संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी साडेचार वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. रत्नागिरीत सांगीतिक चळवळ
रत्नागिरी : 'स्वरनिनाद'तर्फे २८ जुलैला गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम


रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.)। गेली ८० वर्षे अविरत रत्नागिरीकरांसाठी संगीत सेवा देणाऱ्या स्वरनिनाद संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी साडेचार वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे.

रत्नागिरीत सांगीतिक चळवळ सुरू करण्यात कै. विनायकबुवा रानडे, कै. भालचंद्रबुवा रानडे आणि कै. बाळासाहेब हिरेमठ यांचे मोलाचे योगदान आहे. कै. विनायकबुवा रानडे आणि कै. भालचंद्रबुवा रानडे यांनी ८० वर्षांपूर्वी या संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम केला जातो. सध्या स्वरनिनाद अकादमीचे वर्ग माळ नाका आणि शेरे नाका येथे सुरू आहेत. क्यात सुमारे २५० विद्यार्थी तबला, संवादिनी, पखवाजचे शास्त्रीय शिक्षण घेत असून, त्यांना विजय रानडे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, सौ. प्रज्ञा काळे संगीताचे शिक्षण देत आहेत.

रविवारच्या कार्यक्रमाला विनायकबुवा रानडे यांचे शिष्य आणि ज्येष्ठ हार्मोनियमवादक शिरीष आचरेकर, ज्येष्ठ गुरू आणि गायिका सौ. समिता जोशी, ज्येष्ठ गुरू आणि गायिका सौ. विनया परब, प्रसिद्ध तबलावादक आणि गुरू हेरंब जोगळेकर, ॲड. राजशेखर मलुष्टे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात संगीत विद्यालयातील सुमारे १७५ विद्यार्थी गायन, संवादिनी, तबला, पखवाज वादन करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे आणि मुलांचे कलाविष्कार पाहून त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे विजय रानडे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर / हर्षदा गावकर


 rajesh pande