फडणवीसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण - चंद्रकांत पाटील
मुंबई, 1 ऑगस्ट (हिं.स.) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याच्या बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच
देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील


मुंबई, 1 ऑगस्ट (हिं.स.) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याच्या बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक एक पायरी पुढे जायचे असते. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील, तर आम्हा सर्वांना आनंद आहे, त्यांच्यात ते गुण नक्की आहेत. केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर ती आमच्या दृष्टीने सर्वांत आनंदाची गोष्ट आहे, असेही पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेनं चांगला जोर धरला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं भाजपा त्यांची पक्षाच्या जबाबदारीतून मुक्तता करणार आहे. शिवाय त्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला होता, परंतु तो वाढवण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यास या पदापर्यंत पोहोचणारे महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्यानंतरचे ते दुसरे नेते असतील.

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande