धुळे, 15 जानेवारी (हिं.स.) केंद्र सरकारने किमान आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत सुरू असलेल्या मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा कडधान्य खरेदीसाठी 31 जानेवारी, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी दिली आहे.
ज्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी संपर्क करून आपला मूग, उडीद व सोयाबीन मोजमाप करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर