नाशिक मनपा आयुक्तांकडून अनंत कान्हेरे मैदान आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी
नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.)। - महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी अनंत कान्हेरे मैदान आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात, आयुक्त खत्री यांनी जॉगिंग ट्रॅकवर आणि मैदानाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करणे व नियमित पाणी
मनपा आयुक्त खत्रींनीअनंत कान्हेरे मैदान आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी


नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.)।

- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी अनंत कान्हेरे मैदान आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात, आयुक्त खत्री यांनी जॉगिंग ट्रॅकवर आणि मैदानाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करणे व नियमित पाणी मारणे, स्वच्छतागृह नियमित स्वच्छ ठेवण्याचे, मैदानातील भटके व मोकाट कुत्रे यांचा वावर कमी होण्याकरिता सुरक्षा जाळ्या व प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्याची, उद्यान व पाणीपुरवठा यांच्या समन्वयाने जॉगिंग ट्रॅकवर नियमित पाणी मारण्याचे आणि जॉगर्स करिता जॉगिंग ट्रॅक हे पहाटे ४ ते सकाळी ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे निर्देश दिले.

मनपाच्या सर्व विभागांनी समन्वय साधून जॉगिंग ट्रॅक व अनंत कान्हेरे मैदानावर सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कान्हेरे मैदान पहाणी दौऱ्यात आयुक्त मनिषा खत्री यांच्या समवेत शहर अभियंता संजय अग्रवाल, नगरनियोजन कार्यकारी अभियंता सचिन जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिम उपअभियंता नितीन राजपूत, विभागीय अधिकारी चंदन घुगे, पश्चिम उद्यान निरीक्षक किरण बोडके, आणि शाखा अभियंता वसंत ढोमसे, सुभाष बहिरम आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande