पानिपत शौर्य दिनानिमित्त मराठा वीरांना आदरांजली
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।पानिपत युद्धाचा हा 265 वा स्मृतिदिन व पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना महादजी शिंदे छत्री, वानवडी येथे पानिपत शौर्य दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्
पानिपत शौर्य दिनानिमित्त मराठा वीरांना आदरांजली


पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।पानिपत युद्धाचा हा 265 वा स्मृतिदिन व पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना महादजी शिंदे छत्री, वानवडी येथे पानिपत शौर्य दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवीराजे सिंधिया यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

पानिपत शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव शिंदे सरकार यांच्यावतीने करण्यात आले होते . यावेळी सदानंदजी मोरे ( जगतगुरु संत तुकाराम महारानांचे वंशज, इतिहास तज्ञ), पांडुरंगजी बलकवडे (ज्येष्ठ इतिहास तज्ञ), प्रशांतजी जगताप ( माजी उपमहापौर, पुणे मनपा), अँड विकास खामकर (विद्यमान अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन) , अँड विकास ढगे पाटिल (माजी अध्यक्ष, पुणे बार असो), आबासाहेब पाटिल (प्रसिद्ध शिवव्याख्याते), रणवीर सत्यपाल शिंदे सरकार (नाशिक), राजाभाऊ राऊत (उद्योजक ), राजाभाऊ कोटमे (व्यवस्थापक, कोटमगाव ), माजी आमदार जगदिराजी मूळीक. मोहनरावजी शिंदे सरकार, विशाल पाटिल, अँड प्रवीण जी गायकवाड, चंद्रकांत शितोळे , उत्तमरावजी मांढरे, यशवंतजी भोसले, प्रा. प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

महापराक्रमी महाराज महादजी शिंदे यांच्या मंदिरातील पुतळ्यास् मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पानिपतच्या पवित्र मातीचे कलशपूजन केले.

स्वर्गीय राजमाता माधवीराजे माधवरावजी सिंदिया यांना आदरांजली अर्पण करण्यात आले. सदानंदजी मोरे ( जगतगुरु संत तुकाराम महारानांचे वंशज, इतिहास तज्ञ) यांनी या वेळी पानिपत युद्धाची गाथा काही अनुभव सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक उत्तमराव शिंदे सरकार आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande