नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.) : मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने विश्व हिंदी दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या चतुर -चतुरा या स्पर्धेत प्रमोद बच्छाव, निसार शेख हे विजेते ठरले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, हिंदी विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. पी व्ही कोटमे, हिंदी राष्ट्रभाषा मंच प्रमुख प्रा. माधुरी मोगल, प्रा. डॉ. मंगला भवर, प्रा.डॉ.जगदीश परदेशी, परीक्षक प्रा. योगेशकुमार होले, प्रा. पूनम काकड, प्रा. कविता मोराडे उपस्थित होते.
जागतिक हिंदी दिनाचे मुख्य उद्दिष्ट हे भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार- प्रसार करणे हे आहे. हिंदी भाषा ६० कोटीहून अधिक लोक बोलतात. ज्यामुळे ती जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा बनते. हा दिवस भाषेच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतो, तसेच आंतरराष्ट्रीय संवाद आणि देवाण-घेवाण मजबूत करण्यात तिची भूमिका आहे. जागतिक हिंदी दिनाच्या माध्यमातून भारत सरकार जगभरातील लोकांना हिंदी शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते, असे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी यावेळी सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय संस्कृतीत हिंदीला महत्त्वाचे स्थान आहे ही केव्हा संवादाची भाषा नाही तर भारताच्या विविध परंपरा कला आणि साहित्याचे प्रतीक आहे कबीर आणि मिर्झा गालिब सारख्या कवींच्या प्रसिद्ध कृतींपासून ते आधुनिक काळातील लेखक आणि पटकथा लेखकांपर्यंत देशाची सांस्कृतिक भावना व्यक्त करण्यासाठी हिंदी एक आवश्यक साधन आहे. १९७५ला पहिले विश्व हिंदी संमेलन झाले होते, त्यात दरवर्षी १० जानेवारी हा विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे उपप्राचार्य डॉ.पी व्ही कोटमे यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण ४८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI