पुणे : १२०० विद्यार्थ्यांच्या योगा विश्वविक्रमासाठी डीईएस प्राथमिक शाळा सज्ज
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकदेखील स
Thane


पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकदेखील सहभागी होणार आहेत. डीईएस प्राथमिक शाळेत पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आयोजनासाठी शाळेत जय्यत तयारी करण्यात येत असून, विद्यार्थ्यांचा जोरदार सराव सध्या सुरू आहे. या उपक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उत्साहाला मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये योग्य तो बदल करून त्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती डीईएस प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी दिली.

डीईएस प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून योगाचे नियमितपणे प्रशिक्षण दिल्या जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच अनेक पालकदेखील सहभागी झालेले आहेत. शाळेच्या वतीने काहीतरी आगळेवेगळे करण्याच्या उद्देशाने यंदा योगाचा विश्वविक्रम करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने आणि शिक्षकांनी घेतला. त्यातून मग विश्वविक्रमाची संकल्पना समोर आली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, शाळा समिती अध्यक्ष अॅड. राजश्री ठकार, योग शिक्षिका योगिनी कानडे, तसेच उपक्रमाचे सल्लागार डाॅ. मिलिंद संपगावकर हे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटत आहेत.

१५० मिनिटांमध्ये विद्यार्थी वेगवेगळी शारीरिक योगाचे ३० उपक्रम सादर करणार आहेत. या विश्वविक्रमात १२०० विद्यार्थी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा सादर करणार आहेत. याच कार्यक्रमात पालकांच्या ढोलताशा पथकाचे संचलन होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande