येवला, 15 जानेवारी (हिं.स.)।
- तलवार व चाकूचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी केल्याची घटना येवला तालुक्यात घडली ही घटना तालुक्यातील नांदेसर येथे दिनांक 13 जानेवारी ला रात्री साडेआठ पावणे नऊच्या सुमारास साई पैठणी दुकानात घडली
पैठणी चे दुकान चालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात तीन अनोळखी माणसाने शेख यांना तलवार व चाकूचा धाक दाखवून पैठणी दुकानातून सुमारे 19 हजार रुपये किमतीचा माल चोरी केला आहे यामध्ये सहा हजार रुपये गल्ल्यातील रोख रक्कम व दोन मोबाईल असे एकूण 19 हजार रुपये किमतीचा माल चोरट्याने शास्त्राचा धाक दाखवून चोरून नेला. याबाबत येवले तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI