मोरक्कोजवळ स्थलांतरित बोट बुडून 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू 
रबात, 17 जानेवारी (हिं.स.)प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. मॉरिटानिया या आफ्रिकन देशातून
रबात


रबात, 17 जानेवारी (हिं.स.)प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मॉरिटानिया या आफ्रिकन देशातून स्पेनला निघालेल्या बोटीला 2 जानेवारी रोजी अपघात झाला होता. ही बोट सुमारे 13 दिवसांपासून बेपत्ता होती. वॉकिंग बॉर्डर्स या स्थलांतरित हक्क गटाने सांगितले की, मोरोक्कन अधिकाऱ्यांनी बुधवारी 36 जणांची सुटका केली, तर 50 हुन अधिक प्रवासी बुडण्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते.वॉकिंग बॉर्डर्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हेलेना मालेनो यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, बुडालेल्यांपैकी 44 जण पाकिस्तानचे आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने या घटनेवर एक निवेदन जारी केलंय. त्यांनी सांगितलं की, मोरोक्कोमधील दूतावास बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांना मदत करण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी मोरोक्कोमधील पाकिस्तानी दूतावासातील एक टीम दखला येथे पाठवण्यात आली आहे.आम्ही लवकरच मदत देत आहोत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, रबात (मोरोक्को) येथील आमच्या दूतावासाने कळवले आहे की, मॉरिटानिया येथून पाकिस्तानी नागरिकांसह 80 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट, दखला बंदराजवळ उलटली. या अपघातात बचावलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना आणि इतरही काही लोकांना दखलाजवळ एक शिबिरात ठेवण्यात आले आहे. आम्ही लवकरात लवकर मदत पोहोचवत आहोत.पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande