वादविवादातून समाजहिताचे विचारमंथन होते - दिलीपबाबू इंगोले 
अमरावती 4 जानेवारी (हिं.स.) - राज्यात मानाची समजली जाणारी स्व. माणिकराव घवळे स्मृती वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून आजवर समाजातील अनेक चिंतनशील विषयांवर तरुण पिढीने गेल्या तेवीस वर्षांपासून उत्कृष्ट विचारमंथन केले आहे. समाजाच्या हितासाठी तरुण पिढीने
वादविवादातून समाजहिताचे विचारमंथन होते दिलीपबाबू इंगोले यांचे प्रतिपादन स्व.माणिकराव घवळे स्मृती वादविवाद स्पर्धेचे थाटात उदघाटन


अमरावती 4 जानेवारी (हिं.स.) - राज्यात मानाची समजली जाणारी स्व. माणिकराव घवळे स्मृती वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून आजवर समाजातील अनेक चिंतनशील विषयांवर तरुण पिढीने गेल्या तेवीस वर्षांपासून उत्कृष्ट विचारमंथन केले आहे. समाजाच्या हितासाठी तरुण पिढीने अश्या ज्वलंत विषयांवर मंथन करून पुढे मार्गक्रमण करणे हीच अपेक्षा आयोजकांची असावी असे मला वाटते अश्या शब्दात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या आयोजनाची प्रशंसा केली.

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय व स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे थाटात उदघाटन पार पडले. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध किडनीरोग तज्ञ डॉ. अविनाश चौधरी,प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख तसेच संयोजक प्रफुल्ल घवळे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना दिलीपबाबू इंगोले म्हणाले की, गेल्या तेवीस वर्षातील या स्पर्धेच्या प्रवासाचा मी साक्षीदार असून यातून अनेक तरुण घडतांना मी बघितले आहे. तरुणाईचा विचार बळकट करणारी ही वैचारिक चळवळ अशीच मोठी होत राहावी अश्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी डॉ. अविनाश चौधरी यांनी सांगितले की, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ही वादविवाद स्पर्धा सातत्याने करत असून त्यातून अनेकदा आमच्यासारख्यांच्या मनातील प्रश्नांना देखील निश्चितपणे उत्तरे मिळतात.

प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी स्वागतपर भाषण केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रफुल्ल घवळे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा. रत्नाकर शिरसाठ व आभार मयूर चौधरी यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग कंद,नागपूर येथील दै. लोकसत्ताचे सहसंपादक देवेश गोंडाने, बियाणी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मृणाल महाजन व प्रसिद्ध साहित्यिक अमोल सावरकर यांनी काम पाहले तर संपूर्ण स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ञ अतुल गायगोले यांनी धुरा सांभाळली. स्पर्धेत 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला. राज्याच्या कोण्या कोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या ओजस्वी वाणीने स्पर्धेत दमदार विचार मांडले. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande