अमरावती 4 जानेवारी (हिं.स.)विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचे गाजर दाखविण्यात आले. ते पूर्ण झाले नाही. याउलट रात्री १० वाजता थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत असताना त्यात बदल करण्यात आला आहे. आता रात्री १२ वाजता थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे साहेब, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे. रानडुकराच्या कळपाने कहर केला आहे. वाघ आणि बिबट्याचे गावांचे दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. शेतशिवारात वन्यप्राणी दबा धरून बसून राहत आहेत. अशातच उन्हाळी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. गहू, भुईमुंग,रब्बी पीक घेणारे शेतकऱ्यांना रात्री ला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. शेतकऱ्यांना ८ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.
१२ आणि २४ तास विजेचा पुरवठ्याचे स्वप्न भंगले जात आहेत. ८ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत असताना त्यातही शेतकऱ्यांचे जीवावर उठले जात आहेत. थ्री फेज वीजपुरवठा करताना आठवडाभराचा निकष लागू करण्यात येत आहे. दिवस आणि रात्रीचे निकष यात आहेत. आठवड्यातून तीन दिवसांचे निकष आहेत. लाठ्याकाठ्या घेऊन शेतकरी शेतात पंप सुरू करण्यासाठी जात होते. रात्रभर भितभित शेतात शेतकरी मुक्काम ठोकत होते. आता त्यात संताप निर्माण करणारे बदल करण्यात आले आहे.
रात्री १२ वाजता कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. हा बदल शेतकऱ्यांचे जिवावर उठणारा आहे. या निर्णयाचे विरोधात गावात संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागात जंगल तथा लांब पल्ल्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतशिवार आहेत. ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. त्यातही मध्यरात्री थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत असल्याने संताप आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. शेतकऱ्यांनी शेतात किती वेळा ये-जा करायचे. असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.रात्री कृषीपंप सुरू केल्यानंतर पुन्हा काही क्षणासाठी विजेचा पुरवठा बंद झाल्यास पुन्हा त्याच क्षणी शेतात विजेचा पुरवठा सुरू करण्यासाठी जावे लागत आहे. शेतात साप विंचवाची भीतीही तितकीच राहत आहे. यापेक्षा अधिक भीती आता वन्यप्राण्यांची राहत आहे. त्यामुळे रात्रीचा थ्री फेज वीजपुरवठा बंद करून दिवस असताना देण्यात यावे, अशी मागणी सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तिवसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. मानवावर हल्ले सुरू झाले आहेत.रानडुक्कराच्या कळपाने आतंक माजविला आहे. त्यातही रात्री १२ वाजता श्री फेज वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी कृषीपंप सुरू करताना धास्तावला जात आहे. शेतकऱ्यांना १४ तास थ्री फेज वीजपुरवठा करून दिवसा पुरवठा सुरू करण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांची सुरक्षितता वाढेल.
कैलास वाघमारे शेतकरी
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी