रत्नागिरी : गुंतवणुकीतील नफ्याच्या आमिषाने ८ लाखाची फसवणूक
रत्नागिरी, 7 जानेवारी, (हिं. स.) : एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगाऊ मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक एका महिलेने केली. या प्रकरणी
एफआयआर लोगो


रत्नागिरी, 7 जानेवारी, (हिं. स.) : एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगाऊ मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक एका महिलेने केली. या प्रकरणी त्या इन्व्हेस्टर महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही घटना ४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी गांधी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे (श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी) येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुधीर भाऊ सकपाळ यांनी ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एसएमसी १२८ इन्व्हेस्टर स्ट्रॅटेजी अपडेट ग्रुप या ग्रुपच्या अॅडमिन संशयित महिला हिने तिच्या व्हॉटसॲप नंबरवरून फिर्यादी सुधीर सकपाळ यांना कंपन्यांचे अप्पर सर्किट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रेडिंग, आयपीओ यांची माहिती देऊन कंपन्यांचे शेअर ट्रेडिंगबाबत सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी बॅंक खात्यावरून एनईएफटी तसेच यूपीआयवरून रक्कम ट्रान्स्फर करून घेतली.एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीचा लोगो असलेल्या ॲप्लिकेशनमध्ये सकपाळ यांनी केलेल्या रकमेवर त्यांना ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून ते प्रॉफिट फिर्यादी सकपाळ यांना परत देण्यासाठी संशयित महिलेने सकपाळ यांच्याकडून १० टक्के कमिशन आगाऊ मागवून सुधीर सकपाळ यांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ८ लाख ३ हजार ९६९ रुपये तसेच त्यावर फिर्यादी यांना झालेले प्रॉफिट फिर्यादी यांना न देता सुधीर सकपाळ यांची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणी फिर्यादी सकपाळ यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande