मागील वर्षात डोंबिवली पोलिसांनी २१ जणांना केले हद्दपार
डोंबिवली, 7 जानेवारी (हिं.स.) वारंवार गंभीर व हिंसाचाराचा वापर करुन संघटीतपणे दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगुन धाक दाखवणे, शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण करणे असे गुन्हे करणारे आरोपींचे सततचे बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध होणे अ
मागील वर्षात डोंबिवली पोलिसांनी २१ जणांना केले हद्दपार


डोंबिवली, 7 जानेवारी (हिं.स.)

वारंवार गंभीर व हिंसाचाराचा वापर करुन संघटीतपणे दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगुन धाक दाखवणे, शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण करणे असे गुन्हे करणारे आरोपींचे सततचे बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध होणे अत्यावश्यक असल्याने मागील ०३ वर्षामध्ये ०९ गुन्हयामध्ये एकुण २० आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आले. तसेच ०१ आरोपीवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (सुधारीत १९९६) चे कलम ३ (१), दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरसी) अधिनियम १९९७ अन्वये एक (१) वर्ष कालावधीकरीता स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली.

२०२४ या संपूर्ण वर्षात डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर कठोर व प्रभावशिल कारवाई केल्याने गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे असे सांगून जवादवाड यांनी वर्षभराचा संपूर्ण लेखाजोखा सांगितला. त्याप्रमाणे खुनाचा प्रयत्न सारखे गंभीर दुखापतीचे दोन गुन्हे दाखल असुन त्यामध्ये दोन आरोपीसह सर्व गुन्हे उघडकीस आणले. तसेच ही ९ जबरी चोरी करणारे आरोपीना अटक करून चोरी मधील ९७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला.

घरफोडीचे १४ गुन्हे दाखल असुन, दाखल गुन्हयांपैकी ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत यामधील १३ घरफोडी करणारे आरोपींना अटक करून, त्यांच्याकडुन ९,४२,७८० /- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोटार वाहन चोरीचे ३७ गुन्हे दाखल पैकी १७ गुन्हे उघडकीस आले. त्यामधील १२ आरोपींना अटक करून, त्यांच्याकडुन ९,८०,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे ३१ गुन्हे दाखल असुन त्यापैकी १५ गुन्हे उघडकीस आले. त्यामधील १८ आरोपींना अटक करून, त्यांच्याकडुन १,९९,८२४/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महिला अत्याचार प्रकरणात विनयभंग सदराखाली २० गुन्हे दाखल झाले. सर्व गुन्हे उघडकीस आले त्यामधील २० आरोपींना अटक करण्यात आले. फसवणुकीचे २३ गुन्ह्यापैकी १७ गुन्हे उघडकीस आले असून १६ आरोपींना अटक करण्यात आली. तर दुखापतीचे ५० गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामधून ४७ गुन्हे उघडकीस आले. याप्रकरणी ५० आरोपींना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे मागील वर्षी अवैध दारू विक्री व सेवन करणारे इसमांवर एकुण ७१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचेकडुन एकुण १,०३,९८५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मटका, जुगार खेळणारे इसमांविरूध्द् १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडुन एकुण ६६, ४४० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अंमली पदार्थ सेवन व विक्री करणारे इसमांविरूध्द् एकुण ७३ गुन्हे झाले होते त्यांच्याकडुन एकुण ६,८५,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वर्षभरात हरवलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्द्तीने शोध घेवुन एकुण ७,२८,००० /- रूपये किंमतीचे ५५ मोबाईल फोन नागरीकांना परत देण्यात आले. प्रवासी रिक्षामध्ये विसरलेले साहित्याचा सीसीटिव्ही माध्यमातून शोध घेवून एकुण २२,०००,०० /- रू किमतीचे मौल्यवान दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम व इतर साहित्य, नागरीकांना परत करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande