रत्नागिरी : देवरूख येथे अवैध बंदूक जप्त
रत्नागिरी, 7 जानेवारी, (हिं. स.) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देवरूख येथून १ सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, ६ जिवंत काडतुसे, ३ वापरलेली काडतुसे असा एकूण ३६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला ताब
जप्त केलेल्या बंदुकीसह संशयित


रत्नागिरी, 7 जानेवारी, (हिं. स.) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देवरूख येथून १ सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, ६ जिवंत काडतुसे, ३ वापरलेली काडतुसे असा एकूण ३६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

संगमेश्वर-देवरुख रस्त्यावरील मौजे ताम्हाणे या गावी संदीप शांताराम रेवाळे (वय ४८ वर्षे, रा. ताम्हाणे, ता. संगमेश्वर) याच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, उपनिरीक्षक शेषराव शिंदे, हवालदार सुभाष भागणे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande