बीड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीडमध्ये बंदी घातलेल्या रेस्पीफ्रेश टीआर सिरपचा साठा सापडला असल्यामुळे 500बाटल्या जप्त करण्यात आले आहेत. सॅम्पल तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले आहेत
बीड जिल्ह्यात रेस्पीफ्रेश टीआर या बंदी घातलेल्या कफ सिरपचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ५०० हून अधिक बाटल्या जिल्ह्यात आढळल्या असून औषध प्रशासनाने तपास सुरू केला आहे. गेवराई येथून काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, धक्कादायक म्हणजे ज्या बॅचमुळे मध्यप्रदेशात बालकांचे मृत्यू झाले होते, त्या बॅचऐवजी दुसऱ्या बॅचचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर सिरपमधील डीईजीचे प्रमाण स्पष्ट होणार आहे. सहायक आयुक्त एम. जे. निमसे यांनी याची माहिती दिली असून जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis