एआयमुळे बँकींग क्षेत्रात जगात क्रांतीकारी बदल- शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। एआय तंत्रज्ञानामुळे बँकींग क्षेत्रात जगात क्रांतीकारी बदल होत आहेत असे मत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले बँकींग क्षेत्रामध्ये एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे बँकेचे अकाऊंट
अ


लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

एआय तंत्रज्ञानामुळे बँकींग क्षेत्रात जगात क्रांतीकारी बदल होत आहेत असे मत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले

बँकींग क्षेत्रामध्ये एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे बँकेचे अकाऊंट काढण्यापासून ते वसूलीपर्यंत पूर्ण काम एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकींग क्षेत्रामध्ये जगात क्रांतीकारी बदल होत आहेत. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी, लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष तथा बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

भारती सहकारी बँक मुख्य कार्यालय, पुणे यांच्यावतीने नागरी बँक फेडरेशनचे लातूर अध्यक्ष तथा बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या बँकींग क्षेत्रातील आव्हाने व उपाययोजना, एआयचा वापर, स्टाफची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ भगवंत कड हे होते. तसेच भारती सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष सीए जयेश विजयकुमार दुधेडिया, बँकेचे कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील, ओएसडी सुरेश निंबाळकर यांच्यासह सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, बँकींग क्षेत्राच्या माध्यमातून काम करीत असताना फ्रांन्स, जर्मन, स्वित्झरलँड आणि अमेरिका अशा अनेक ठिकाणी बँकांना भेटी देऊन महाराष्ट्र नागरी बँकेची प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अमेरिकेतील करण कानेकर यांच्याशी करार करून एआय मधील सर्व तंत्रज्ञान बँकीग क्षेत्रातील अधिकारी कर्मचार्‍यांना देण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.

लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष तथा बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष जयेश विजयकुमार दुधेडिया यांनी केला.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande