अपहरण प्रकरणी अजय बागुलाना अटक
नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। - पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्याची कारवाई सुरूच ठेवली असून यामध्ये गोळीबार प्रकरणी भाजप नेते बागुल यांचा पुतण्याला मध्य प्रदेश म्हणून अटक केली आहे तर सातपूर येथील प्रकरणांमध्ये आरोपींना वाडी पोलीस कस्टडी मिळाली आहे.
अपहरण प्रकरणी अजय बागुलाना अटक


नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

- पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्याची कारवाई सुरूच ठेवली असून यामध्ये गोळीबार प्रकरणी भाजप नेते बागुल यांचा पुतण्याला मध्य प्रदेश म्हणून अटक केली आहे तर सातपूर येथील प्रकरणांमध्ये आरोपींना वाडी पोलीस कस्टडी मिळाली आहे. दरम्यान सातपूर प्रकरणांमध्ये आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांच्या ऑफिसच्या झडती घेतली असता या ठिकाणी भुयार सापडले आहे

गंगापूर रोड वरील गोळीबार प्रकरणात फरार असलेला भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल सह तिघांना शनिवारी रात्री मध्य प्रदेश या ठिकाणावरून पोलिसांनी अटक केल्यानंतर आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार घटनेनंतर अजय बागूल फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अजय बागुल आणि पप्पू जाधवसह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. राणेनगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय २८) याच्यावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला बोरिसा व चोथवे यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यानंतर साळुंकेने रात्री सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात या पूर्वी मामा राजवाडे यालाही पोलिसांनी अटक केली होती या सर्व आरोपींना न्यायालयाने 17 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे

दरम्यान सातपूर येथील गुन्ह्यात आज 12 ऑक्टोंबर रोजी एकूण ९ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यापैकी ६ आरोपींना ज्यामध्ये १. प्रकाश लोंढे २. दीपक लोंढे ३. संतोष पवार ४. अमोल पगारे ५. देवेश शिरताटे व ६. शुभम गोसावी यांचा समावेश आहे न्यायालयाने दिनांक १४ ऑक्टोबर . पर्यंत वाढीव पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. त्यानंतर रविवारी दुपारी रिपब्लिकन पक्षाचे नेते व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाची झडती पोलिसांनी घेतली त्यावेळी प्रकाश लोंढे उपस्थित होते पोलिसांना या ठिकाणी आरोपींना पळून जाण्यासाठी भुयार देखील सापडले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande