अशोक चव्हाण यांनी रेणुका देवीचे दर्शन घेऊन घातले साकडे
नांदेड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
अ


नांदेड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी रेणुका मातेला काही साकडे घातले का असा प्रश्न निर्माण झाला आहे

नांदेड जिल्ह्यात माहूर हे रेणुका देवीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे नवरात्र आणि पौर्णिमेला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रातील नव्हे तर देश विदेशातील भक्त देखील या ठिकाणी येतात श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण दाखल झाले.

नांदेड जिल्ह्यातील राजकारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रेणुका देवीला त्यांनी काही साकडे घातले आहे काय असा प्रश्न चर्चिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande