बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्याील सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती हाती आली आहे.
हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या आणि त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला केला.
जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis