लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील वर्षावास समापन सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते
तक्षशिला बुद्ध विहार व विपश्यना भूमी, काळेगाव या पवित्र स्थळी वर्षावास समापन सोहळा आणि भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना या मंगल प्रसंगी उपस्थित राहून उद्घाटन करण्यात आले.
एवढी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की,
हा दिवस केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.
भगवान बुद्धांनी दिलेला “अप्प दीपो भव — स्वतःच दीप बना” हा संदेश आजही आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि समता या तत्त्वांना भारतीय समाजजीवनात रुजवून खऱ्या अर्थाने परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली.
त्यांच्या या धम्ममार्गावर चालणं म्हणजे विचार, विवेक आणि माणुसकीचा उत्सव साजरा करणं होय.
माता रमाई यांच्या स्मरणाने आज प्रत्येक हृदयात त्या करुणामय मातृत्वाची जाणीव झाली. बाबासाहेबांच्या संघर्षमय वाटचालीत त्यांनी दिलेलं त्यागाचं आणि साथिचं उदाहरण आजही प्रेरणा देतं.
या मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे हे तक्षशिला बुद्ध विहार अधिक तेजस्वी, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून उदयास येईल.
इथून येणाऱ्या पिढ्यांना धम्म, प्रज्ञा आणि करुणा यांचा संदेश लाभत राहो, हीच प्रार्थना.
या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या शिकवणीचा प्रसार घराघरात नेण्याचा संकल्प करूया.
समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीचा धागा हातात धरूनच आपण बाबासाहेबांच्या स्मृतीला खरं अभिवादन करूया. असे शिरसाट म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis