बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा आरोप केला. कै
बीड जिल्हा कारागृह


कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड


बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा आरोप केला. कैद्यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तीन हिंदू आणि एक मुस्लीम पक्षकारावर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्म परिवर्तन करत नसल्यानं कैद्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. या प्रकरणात पेट्रस गायकवाड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड चांगलंच चर्चेत आलं. त्यानंतर बीडच्या कारागृहात कराडचं रवानगी करण्यात आली. कारागृहात कराडला मिळणारी व्हीआयपी ट्रिटमेंटवरून बीड कारागृह चांगलंच चर्चेत आलं होतं. मात्र, आता धर्मांतरणच्या मुद्द्यावरून कारागृह अधीक्षकांवर आरोप करण्यात आला.

कैद्यांचे वकील आणि एका कैद्याच्या पत्नीनं कारागृहातील आपबीती सांगितली. आमदार गोपीचंद पडळकरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. तसंच त्यांनी देखील कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही पडळकरांनी यावेळी म्हटलंय. तर प्रताप सरनाईक यांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याआधीही वादात सापडले होते. कैद्यांकडून स्वतःच्या मालकीच्या वाहने स्वच्छ करून घेणं. तसंच जिल्हा कारागृह परिसरातील अवैध वृक्षतोड आणि आता जेलमधील कैद्यांच्या धर्मांतरांच्या आरोपांमुळे ते पुन्हा एकदा आरोपाच्या पिंज-यात अडकलेत. त्यामुळे या प्रकरणी कोणती प्रशासनाकडून कोणती अॅक्शन घेतली जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande