अनीता आनंद आणि जयशंकर यांच्यात बैठक
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : कॅनाडाच्या परराष्ट्रमंत्री अनीता आनंद यांनी सोमवारी भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा देण्यावर भर देण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी आनंद यांचे स्वागत करताना सांगितले की, त्यांचा हा दौरा भारत-कनाडा संबंधांना नवी दिशा आणि गती देईल. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, मोदींनी नमूद केले की व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि लोक-ते-लोक संबंध यामधील सहकार्य वाढविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, जूनमध्ये जी-7 शिखर परिषदेदरम्यान कनाडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी त्यांची ‘अत्यंत फलदायी’ चर्चा झाली होती.ही अनीता आनंद यांची, परराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतरची पहिली भारत भेट आहे.
जयशंकर-अनंद यांच्यात सकारात्मक चर्चा
या दौऱ्यादरम्यान अनीता आनंद यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, “26 मे रोजी झालेल्या आमच्या टेलिफोनिक संवादानंतर ही आमची चर्चा पुढे सुरू असलेल्या सकारात्मक संवादाचा भाग आहे. भारत-कनाडा द्विपक्षीय संबंध गेल्या दोन महिन्यांत सातत्याने प्रगती करत आहेत. जयशंकर पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी जी-7 परिषदेदरम्यान कार्नी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले होते की, भारत सकारात्मक विचारसरणीसह पुढे जायला इच्छुक आहे. आज सकाळी तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात आणि भारत-कनाडा सहकार्याबद्दल त्यांची दृष्टीकोन जाणून घेतला. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “आजच्या चर्चेत आम्ही एक महत्वाकांक्षी ‘रोडमॅप’ तयार केला आहे, ज्यामुळे व्यापार, गुंतवणूक, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, नागरी अणुऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), महत्त्वाचे खनिज आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल.
भारत-कनाडा संबंध मजबूत होतील
अनीता आनंद यांनी त्यांच्या स्वागताबद्दल आभार मानले आणि सांगितले, “आज दिल्लीत तुमच्यासोबत भारत-कनाडा संबंध वृद्धिंगत करण्याची संधी मिळाल्याने आम्ही अत्यंत आभारी आहोत.”त्यांनी सांगितले की, “१३ मे रोजी मी परराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर आमच्यात अनेक चर्चांचा सकारात्मक अनुभव आला. पंतप्रधान कार्नी यांना जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना आनंद झाला आणि त्यावेळची चर्चा आजच्या संवादासाठी दिशादर्शक ठरली.”त्यांनी पुढे म्हटले की, “आपण आज भारत-कनाडा संयुक्त निवेदनावर चर्चा करणार आहोत, ज्यात विविध मुद्दे समाविष्ट असतील – हे मुद्दे द्विपक्षीय संबंध अधिक उंचीवर घेऊन जाण्यास मदत करतील.”
सुरक्षा आणि सहकार्याबाबत चर्चा
आनंद म्हणाल्या, “आपण सुरक्षाविषयक संवादाबाबत जे मत व्यक्त केले, त्याचे मी कौतुक करते. आमचे सहकार्य महत्त्वाचे खनिज, ऊर्जा, एआय आणि हवामानबदल या क्षेत्रांत वाढत असताना सुरक्षा संवाद सुरूच राहील.”त्यांनी स्पष्ट केले की, काही आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये झालेली सुरक्षा व कायदा अंमलबजावणीविषयक बैठक अत्यंत उपयुक्त ठरली, आणि अशा संवादाला दोन्ही सरकारांचा पाठिंबा आहे.तसेच, आनंद म्हणाल्या की, “कनाडा एक पूरक अर्थव्यवस्था, खुले समाज, विविधता आणि बहुसंस्कृती असलेला देश आहे – जे दीर्घकालीन, स्थिर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे दोन्ही देशांचे सरकार या संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहेत.”
अनीता आनंद यांचा हा दौरा, 2023 मध्ये निर्माण झालेल्या भारत-कनाडा तणावानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या एक महत्त्वाच्या पावलासारखा मानला जात आहे.हा तणाव तेव्हा निर्माण झाला होता, जेव्हा कनाडाचे तत्कालीन पंतप्रधान मार्क कार्नी यांनी असा आरोप केला होता की, खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारताची संभाव्य भूमिका आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode