पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुणे जिल्ह्यात २२ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोन विक्रेते कफ सिरप आणि इतर औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर तत्काळ औषध विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम एफडीएकडून हाती घेतली आहे. एफडीए प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तीन औषध दुकानदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम एफडीएकडून हाती घेतली आहे.
एफडीए प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन औषध दुकानदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. नागरिकांनी औषधे घेताना वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु