अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन डीबी बरखास्त
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) वाढत्या गुन्हेगारी व अवैद्य धंद्यावर वचक ठेवण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी डीबी पथक नेमण्यात आले होते. परंतु नुकत्याच काही महिन्यापूर्वी नविन आलेले ठाणेदार यांनी ठाण्याच्या प्रभार घेतल्या
नो डिटेक्शन ’ अंजनगाव पोलीस स्टेशन डीबी बरखास्त अंजनगाव सुर्जी ठाणेदारांचे आदेश


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

वाढत्या गुन्हेगारी व अवैद्य धंद्यावर वचक ठेवण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी डीबी पथक नेमण्यात आले होते. परंतु नुकत्याच काही महिन्यापूर्वी नविन आलेले ठाणेदार यांनी ठाण्याच्या प्रभार घेतल्या पासून येणाऱ्या आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अभ्यास करून ठाणेदार सुरेश बोंडे यांनी सदर डीबी पथक पूर्णपणे बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.

अंजनगाव सुजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ४३ ते ४५ ग्रामीण गावे तसेच शहर यामध्ये होणारे अवैध व्यवसाय रोखण्याकरिता व कारवाई करण्याबाबत गस्त वाढवणे घरपोडी, चेन स्नेसिंग, सारख्या गुन्हे प्रकरणावर भर द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार केल्या होत्या तसेच दुचाकी चोरी, घरफोडी चे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात अंजनगाव शहरात वाढले होते याबाबत ठाणेदार सदर डीबी पथकाच्या कामगिरी बाबत नाराजी व्यक्त होती तसे वारंवार होणाऱ्या चोरी व इतर बाबत अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हे उघडतेस आणत होते.तर अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पथक नावाच होते त्यामुळे सदर ठाणेदार सुरज बोंडे यांनी अंजनगाव पोलीस स्टेशन मधील डीबी पथक बरखास्त कले असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस स्टेशनमधील महत्वाचे डिपी पथक का?

गुन्हे शाखेच्या पथकाशिवाय पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकही जुगारअड्डा, सट्टापट्टी, अवैध दारू विक्री,किंवा क्रिकेट सट्टेबाजी सुरू होऊ शकत नाही. तसेच गांजाविक्री, अंमली पदार्थ विक्री किंवा जुगार अड्डा सुरू करायचा असल्यास स्थानिक पोलिस स्टेशनपेक्षा गुन्हे शाखेच्या पथकाची परवानगी मिळविण्यासाठी जुगार अड्डे संचालक धडपड करीत असतात त्यामुळे हे पथक पोलीस स्टेशनचे महत्वाचे समजले जाते या पथकात प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना वाटते आपली या नेमणूक व्हावी

नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांना डीपीमध्ये स्थान द्या

जर ठाणेदार यांनी नवीन डीबी पथक स्थापन केले तर त्या पथकामध्ये नवीन दमाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थान मिळावे अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये रंगत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande