संघ एक सांस्कृतिक शक्ती, देशभक्त संघटन - फडणवीस
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घातल्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्त संघटन आहे. राष्ट्रीय विचारांनी प्
मुख्यमंत्री फडणवीस


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घातल्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्त संघटन आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित, मूल्याधिष्ठीत अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचे कार्य संघ करते. जे लोक प्रसिद्धीकरता संघाच्या शाखा, बैठका बंद करण्याची मागणी करतात, त्यांच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभाग भाजपा पदाधिकारी बैठकीदरम्यान माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले आगे. यात सरकारी जागेत संघाच्या कार्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रियांक खरगेंच्या मागणीवरुन भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ते वडिलांच्या भरवश्यावर राजकारण करत असून सदर वक्तव्य हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचेही म्हटलं आहे.

प्रियांक खरगेंनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांमध्ये शाखा आणि बैठका आयोजित करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना संविधानाच्या तत्वांविरुद्ध काम करत आहे आणि तिचे कार्यकर्ते मुलं आणि तरुणांमध्ये अशांतता पसरवत आहेत, ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येत आहे. प्रियांक खरगे यांच्या पत्रानंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande