अभय योजनेत ३६ कोटींची वसुली ३९ हजार ४८४ करदात्यांनी मिळवली ८ कोटींची सूट
नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।नाशिक महापालिकेने सातशे कोटींचा थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातही शास्तीवर ९५ टक्के सूट देण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते १३ तारखेपर्यंत ३९ हजार ४८४ कर
अभय योजनेत ३६ कोटींची वसुली ३९ हजार ४८४ करदात्यांनी मिळवली ८ कोटींची सूट


नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।नाशिक महापालिकेने सातशे कोटींचा थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातही शास्तीवर ९५ टक्के सूट देण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते १३ तारखेपर्यंत ३९ हजार ४८४ करदात्यांनी अभय योजनेला प्रतिसाद देत ३५ कोटी ९३ लाख ४६ हजार १२९ रुपयांचा भरणा केला आहे. त्यातून आठ कोटी २५ लाख ६ हजार ४७ रुपये एवढी सूट मिळवली.

शहरात घरपट्टीचे एकूण पाच लाख ८३ हजार मिळकतधारक आहेत. मात्र, यातील बहुतांशी करदात्यांकडे सव्वासातशे कोटींची थकबाकी आहे. परिणामी सातशे कोटींचा घरपट्टी थकबाकीचा डोंगर झाला आहे. तो कमी करण्यासाठी महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी चारशे कोटींचे कर्जरोखे उभारण्याची नामुष्कीओढावल्यानंतर महापालिकेवर थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात आठ टक्के करसवलत देऊनही करदात्यांनी पाठ फिरवली. ३३० कोटी शास्तीची थकबाकी असून, उर्वरित चारशे कोटी नियमित घरपट्टीच्या रकमेचा समावेश आहे. घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

महापालिकेच्या रेकॉर्डवर सुमारे पाच लाख ८३ हजार मिळकतींची नोंद आहे. त्यावर घरपट्टीची आकारणी केली जाते. दोन लाख १२ हजार पाणीपट्टीधारक आहेत. महापालिकेने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटपाचे काम पुण्याच्या संस्थेला दिले आहे. शहरात नवीन पाणीपट्टीधारक शोधण्याबरोबर बिल वाटपाचे काम सुरू आहे. आतापर्यतच्या पाहणीत तब्बल सत्तर हजारांहून अधिक पाणी मीटर बंद अवस्थेत आढळले आहे. महापालिका घरपट्टी वेळेत वसूल व्हावी यासाठी दरवर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करसवलत योजना राबवण्यात येते. त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान अभय योजनेद्वारे दंडात शास्तीवर ८५ टक्के सूट दिली जाते.

मनपा कर विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी सांगितले की, सप्टेंबप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातही अभय योजनेची अंमलबजावणी सुरू असून, शास्तीवर ९५ टक्के सूट दिली जात आहे. त्याचा लाभ घेऊन मिळकतधारकांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी. त्यांच्याकडील थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande