हरियाणात एएसआयची आत्महत्या; आयपीएस पूरन कुमारवर गंभीर आरोप
रोहतक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। हरियाणामध्ये आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांचा वाद अजूनही शांत झालेला नसतानाच मंगळवारी रोहतकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक येथे सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षक (एएसआयने) स्व
ASI Haryana committed suicide


रोहतक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। हरियाणामध्ये आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांचा वाद अजूनही शांत झालेला नसतानाच मंगळवारी रोहतकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक येथे सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षक (एएसआयने) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी एएसआयने एक व्हिडिओही रेकॉर्ड केला असून त्यामध्ये त्याने दिवंगत आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

एएसआयने आत्महत्येपूर्वी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आयपीएस पूरन कुमार भ्रष्टाचारात गुंतलेले होते आणि सरकार आता चांगल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. मी माझ्या जीवाची आहुती देत आहे. पोलिसांनी एएसआयचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी लाढौत रोडवरील एका खोलीत एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृताची ओळख सायबर सेलमध्ये तैनात असलेला एएसआय संदीप लाथर अशी झाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांनी अद्याप त्याबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.

व्हिडिओ मेसेजमध्ये एएसआयने म्हटले आहे की, वाय. पूरन यांनी एका प्रकरणात पन्नास कोटी रुपयांची सौदा केला होता. या प्रकरणात रोहतकचे एसपी नरेंद्र बिजरणिया यांनी हस्तक्षेप केला होता आणि ते एक प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच एएसआयने हेही सांगितले की, ज्या दिवसापासून आयपीएस पूरन सिंह रोहतक येथे कार्यरत झाले, त्या दिवसापासून जातीयवाद सुरू झाला. मी या भ्रष्ट आणि अन्यायकारक व्यवस्थेने त्रस्त होऊन माझा जीव देत आहे.

घटनेची माहिती मिळताच मृत एएसआयचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande