परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.) :सामाजिक बांधिलकीचे भान राखून येथील अर्थपूर्ती पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांच्याकडे सुपूर्द केला .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप सावजी कळमकर, उपाध्यक्ष किशोर देशपांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चिद्रवार यांनी जिल्हा उपनिबंधक श्री भालेराव यांची भेट घेऊन संचालक मंडळाचे वतीने धनादेश प्रदान केला.यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहनिबंधक श्री भोसले व कार्यालय अधीक्षक श्री दूधमल यांचीही उपस्थिती होती. जिल्हा उपनिबंधक श्री भालेराव यांनी पतसंस्थेच्या या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि समाजासाठी पतसंस्था करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. पतसंस्थेच्या या निर्णयामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis