लातूर - आस्थापनांना ईआर-1 विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन
लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ही तरतूद रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम 1959 आणि त्याअंतर्गत नियमावली 1960
लातूर - आस्थापनांना ईआर-1 विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन


लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ही तरतूद रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम 1959 आणि त्याअंतर्गत नियमावली 1960 नुसार लागू आहे. केंद्र व राज्य शासन, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी हे विवरणपत्र 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

ईआर-1 सादर करण्यासाठी नियोक्त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर एम्प्लॉयर लॉगईनमध्ये युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगईन करावे. त्यानंतर डॅशबोर्डवरील ईआर-1 ऑप्शनवर क्लिक करून, एंटर ईआर-1 वर क्लिक करत विवरणपत्र सादर करावे, विवरणपत्र सादर करताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास 02382-299462 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande