लातूर ग्रामीणमध्‍ये भाजपाला शंभर टक्के यशासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावे - आ. कराड
लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, जिकरीचे प्रयत्न केले. मतदारानी मोठा आशीर्वाद दिला यामुळेच लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाच्या विजयाचा नवा इतिहास घडला. येणाऱ्या काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जि
अ


लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, जिकरीचे प्रयत्न केले. मतदारानी मोठा आशीर्वाद दिला यामुळेच लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाच्या विजयाचा नवा इतिहास घडला. येणाऱ्या काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाला शंभर टक्के यश मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भाजपा नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी केले.

येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीची बैठक भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, हनुमंतबापू नागटिळक, चिटणीस दशरथ सरवदे, लातूर संगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूरचे अध्यक्ष सतीश आंबेकर, मंडळ अध्यक्ष महेंद्र गोडभरले, यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मागील वेळी रेणापूर नगरपंचायत आणि रेणापूर पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आली होती तर जिल्हा परिषदेच्या ११ पैकी ६ जागेवर यश मिळाले होते. बहुतांशी जागा अत्यंत कमी मताने आपल्या हातून गेल्या. यावेळी प्रत्येक मतदार संघात,नप प्रभागात पक्षाच्या वतीने जनतेच्या भावना जाणून घेऊन जनतेच्या शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाईल असे बोलून दाखवले.

लातूर ग्रामीण मतदार संघातील जवळपास सर्वच मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली, शासनाच्या विविध योजनेतून निधी मिळवून दिला. गेल्या महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महायुती शासनाने पॅकेज जाहीर करून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे मोठे पॅकेज आजपर्यंत कोणीच दिले नाही. असे सांगून संत श्री गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचे राज्यात सर्वप्रथम विजयादशमीच्या दिवशी गाळप सुरू झाले असून दिवस रात्र कारखाना सुरू आहे. आडवणूक होत असलेल्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना कारखान्याच्या माध्यमातून सक्षम पर्याय मिळाला आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande