बीड मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी आमदार क्षीरसागरांन घेतली जयकुमार गोरे यांची भेट
बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री .जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा व इतर ग्रामविकास विषयक तातडीच्या समस्या मांडल्या. ग्रामविकास हा
आमदार संदीप क्षीरसागर


बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री .जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा व इतर ग्रामविकास विषयक तातडीच्या समस्या मांडल्या.

ग्रामविकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक निधीची तरतूद करून कामे तातडीने मंजूर करावीत, अशी ठाम मागणी यावेळी केली..मंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ग्रामविकासाच्या कामांना वेग देण्याचे आश्वासन दिले.बीड मतदारसंघाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे व राज्यकर्त्यांपर्यंत ह्या समस्यांसाठी न्याय मागणे ही माझे कर्तव्य आहे. बीड विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी प्रयत्नशील आहे. अशी प्रतिक्रिया याप्रसंगी आमदार क्षीरसागर यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande