बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली असता शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण स्वागत केले.
सन २००९ ते २०१४ या कालावधीत जिल्हा परिषद शाळांसाठी वर्गखोल्या, डिजिटल क्लासरूम, प्रयोगशाळा साहित्य आदी मूलभूत सोयींवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे या मतदारसंघातील अनेक शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा परिषद शाळा, ढाळेवाडी ही एक शाळा आहे.
तालुक्यात मुकादम व ऊस तोडणी कामगारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या ढाळेवाडीमध्ये पालक, शिक्षकवर्ग आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळेने आयएसओ मानांकन प्राप्त केले. आज या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये तसेच विविध क्षेत्रांत व उद्योगांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. या गावातील स्थलांतर दर केवळ ५% पर्यंत खाली आलेला असून, शिक्षण आणि जिद्द यांच्या जोरावर हे यश साध्य झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
शाळेची पाहणी करताना ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून शाळेला देण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे लोकार्पण केले. यावेळी शिक्षक व ग्रामस्थांनी माहिती दिली की, २०१० ते २०१४ या काळात माझ्या स्थानिक विकास निधीतून दोन वर्गखोल्या उभारण्यात आल्या तसेच ‘समग्र शिक्षण अभियान’ योजनेअंतर्गत आणखी दोन वर्गखोल्या मिळाल्या. या चारही वर्गखोल्यांची बांधणी आजही मजबूत असून शाळा त्यांचा उपयोग प्रभावीपणे करत आहे.
याशिवाय ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले असून त्या मैदानाचीही आमदार धस यांनी पाहणी केली.
याप्रसंगी , ढाळेवाडी ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis