नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे सुरू असून पुढच्या काही दिवसांत आणखी काही कामांचा श्रीगणेशा होणार आहे. सिंहस्थ कामांसाठी लॉबिंग सुरू असल्याचे आरोप करत विशिष्ट ठेकेदारांना कामे देण्याचा घाट असल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेकेदारांना टेंडरसाठी स्पर्धात्मक दर भरा, बरोबर काम मिळेल, असे म्हणत त्यांचे कान टोचले.
महापालिकेत आयुक्त खत्री यांच्या उपस्थितीत ठेकेदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी ठेकेदारांना दर्जेदार कामे करण्याचे आदेशही दिले. मागील सिंहस्थात राहिलेले रस्ते, इनर रिंगरोड व नव्याने करावयाचे रस्त्यांचे कामाला कात्री मारण्यात आली आहे. सध्या जे जुने रस्ते आहेत त्यांचेच काम केले जाणार आहे. मार्च २०२७ पर्यंत रस्ते काम पूर्ण करण्याचे आव्हान बांधकामसमोर आहे. शहरात अमृतस्नानाच्या दिवशी कोट्यवधी भाविक नाशकात येण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने रामकुंड व जेथे घाट निर्मिती केली आहे तेथपर्यंत भाविकांना पोहोचण्यासाठी रस्तेकाम केले जाणार आहेत. मनपाच्या बांधकाम विभागाने शासनाकडे रस्तेकामासाठी २ हजार ६८ कोटीची मागणी केली असता, त्यांपैकी अवघे ९३० कोटींना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जुन्याच रस्त्यांचे नव्याने काम केले जाणार आहे. सिंहस्थामधील कामे विशिष्ट ठेकेदारांना देण्याबाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. आगामी सिंहस्थाच्या पाशर्वभूमीवर सुरू करण्यात येत असलेल्या विविध कामांच्या टेंडरसाठी स्पर्धात्मक दर भरा, कोणतेही टेंडर मॅनेज होणार नाही, असा कडक इशारा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेकेदारांना दिला.
आयुक्त खत्री यांनी, या कामांना आता लगाम बसणार आहे. सिंहस्थातील रस्तेकामांना घरा महिन्यांपेक्षा कालावधी अस कामांचा नारळ लवकरच फोडला गार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका प्रशासनाला जुन्याच रस्त्यांचे अस्तरीकरण करावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV