नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. हद्दीबाहेरील प्रकल्पांना पाणीपुरवठा थांबवावा व स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक महानगरपालिके च्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड यासारख्या अनेक विभागांमध्ये न नागरिकांना ऐन दिवाळीत तीव्र 5 पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली असून गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांमधून होणारा पाणीपुरवठा दिवसें दिवस - अपुरा ठरत आहे. दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण असून, सर्वत्र साजरा केला जातो, या काळात स्वच्छता, फराळ, पूजा व इतर घरगुती कामांसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशा वेळी पाणीटंचाईमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत असून, आरोग्य व स्वच्छतेवरही परिणाम होत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली दोन दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. मनपा अधिकारी, तसेच व्हॉल्वमनला हाताशी धरून शहरात असमतोल पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करून याबाबत वेळीच दखल घेऊन शहर व उपनगरात कृत्रिम पाणीटंचाईला कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV