रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील - धीरज देशमुख
लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत. असे मत काँग्रेस पक्षाचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रेणापूर काँग्रे
अ


लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत. असे मत काँग्रेस पक्षाचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रेणापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की, रेणापूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने जे काही चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून रेणापूर नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विविध वार्डांचा विकास साधला.हे काम करत असताना भेदभाव न करता जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य दिले आहे.

रेणापूर नगरपंचायत निवडणूक आम्ही पुर्ण ताकदीने लढवणार असून काँग्रेस विचाराचा अध्यक्ष व सदस्य निवडून आणण्यासाठी ठाम निर्धार आम्ही सर्वांनी यावेळी केला असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande