लातूर - अंकुलगा राणी : चित्रकला काकडे उपसरपंचपदी बिनविरोध
- गावकऱ्यांचा सर्वानुमते निर्णय लातूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - तालुक्यातील अंकुलगा राणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुलोचना गणेश गुराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत सौ. चित्रकला अरूण काकडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते ब
अ


- गावकऱ्यांचा सर्वानुमते निर्णय

लातूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - तालुक्यातील अंकुलगा राणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुलोचना गणेश गुराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत सौ. चित्रकला अरूण काकडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

शोभा रामदास साकोळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी चित्रकला अरुण काकडे यांची निवड करण्यात आली. यासाठी विस्तार अधिकारी अमोल गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी दिनकर बोयणे, ग्राममहसूल अधिकारी विकास शिनगारे, कृषी सहाय्यक सूर्यवंशी यांनी काम पाहिले. यावेळी गणेश गुराळे, अरुण काकडे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विकास जागले, पांडुरंग शेंडगे, नागेश काळगे, मीराबाई पालनपल्ले, ऊषाबाई पाटील, चेअरमन जयद्रथ शेंडगे, तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम गुराळे, शालेय समिती अध्यक्ष भगवान कांबळे यांच्यासह वैशंपायन जागले, माणिक गायकवाड, ओमकार पाटील, एकनाथ हारगे व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande