लातूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता साठी दिला निधी
लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अलीकडील पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लातूर डिस्ट्रिक्ट होमिओपॅथिक डॉक्टर्स ग्रुप तर्फे निधी संकलन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक तस
अ


लातूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अलीकडील पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लातूर डिस्ट्रिक्ट होमिओपॅथिक डॉक्टर्स ग्रुप तर्फे निधी संकलन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक तसेच सीसीएमपी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या निधी संकलनातून एकूण २७ हजार २०७ रुपये इतकी रक्कम जमा झाली असून, मुख्यमंत्री सहाय्यक मदतीला ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. संदीप खानापुरकर, डॉ. राम ह. गहेरवार, डॉ. रविराज पोरे, डॉ. गणेश पोतदार, डॉ. ऋषिकेश खरोळकर, डॉ. अनिता सोळंके, डॉ. रेखा झिरपे, डॉ. आम्रपाली देशमुख आणि डॉ. उर्वी नागुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र, विशेषत: मराठवाडा, पुर आणि अतिवृष्टीच्या संकटातून जात असताना, समाजातील संवेदनशील घटक म्हणून डॉक्टरांनी दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी खरोखरच प्रेरणादायी आहे. हा सामूहिक उपक्रम लातूर जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम प्रत्यय देणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande