शिवसेनेच्या परभणी प्रभारी महानगर प्रमुखपदी माणिक पोंढे यांची नियुक्ती
परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रसार करत, शिवसेना पक्ष संघटन बळकट करण्यासाठी परभणी महानगरातील जबाबदारी माणिक उत्तमराव पोंढे यांच्याकडे सो
शिवसेनेच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी माणिक पोंढे यांची नियुक्ती


परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रसार करत, शिवसेना पक्ष संघटन बळकट करण्यासाठी परभणी महानगरातील जबाबदारी माणिक उत्तमराव पोंढे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माणिक पोंढे यांची परभणी महानगर प्रभारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.

यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, भास्करराव लंगोटे आदींची उपस्थिती होती.

शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊरावे मोरे यांनी स्वाक्षरी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, “आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा सक्रीय प्रचार-प्रसार करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.”

नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर माणिक पोंढे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, परभणी महानगरात शिवसेनेची संघटना अधिक सक्षम आणि जनतेशी निगडित करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या नियुक्तीमुळे परभणी महानगरातील शिवसेनेच्या कार्यात नवी उर्जा आणि गती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande