परभणीतील बालविद्याविहारच्या साक्षी कुलकर्णी व भार्गवी कौसडीकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये बालविद्याविहार प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महा
परभणीतील बालविद्याविहारच्या साक्षी कुलकर्णी व भार्गवी कौसडीकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड


परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये बालविद्याविहार प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महानगरपालिका कल्याण मंडप येथे झालेल्या योगासन स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात कु. साक्षी कुलकर्णी, तर शिवाजी महाविद्यालय मैदानावर पार पडलेल्या गोळाफेक स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात कु. भार्गवी कौसडीकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत विभागीय स्तरावर निवड मिळवली आहे.

विद्यार्थिनींनी साधलेल्या या यशाबद्दल बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. ए. झरकर, सचिव डॉ. विवेक नावंदर, मुख्याध्यापक नितीन गोरडकर, क्रीडा शिक्षक आदित्य गायकवाड तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande